माझ्या मनातली ती परी......



आज माझी सकाळ जरा लवकरच झाली. एवढ्या सकाळी जाग आलीच होती तर म्हटलं उठाव आणि सकाळ कशी असते जरा बघावं. म्हणून मी आईला न उठवता स्वतःच उठलो आणि सकाळच्या सगळ्या विधी आटोपून मस्त असा गरम चहा मी स्वतः बनवलेला बर का.... एका कपात घेवून गॅलरी मध्ये आलो तेंव्हा सकाळचे जेमतेम ५ वाजले होते.....

सूर्याची सुदंर किरणे गॅलरी मध्ये डोकावत होती आणि मी ही आपल्या सकाळच्या निसर्गाचं दर्शन घेत चहाचा आस्वाद घेत होतो. सकाळची ती सूर्याची किरणे, निसर्गाचं ते  सुंदर रूप , पक्ष्याचे ते कीलबिलनारे आवाज, मी अनुभवत होतो तितक्यात एक शाळेची बस व्या ब्रेक चां आवाज कानावर पडला आणि त्याच्या समोरूनच एक लहानशी चिमुरडी ३ वर्षाची असावी, आपली लहानशी पाऊल टाकत आपल्या आईच्या बोटाला पकडून येत होती. आईच्या पाठीवर एक छोटी स्कूल बॅग आणि उशीर झाला म्हणून मुलीला गडबडीने गाडीत बसवून बस क्लिनर ला "नीट सांभाळून गाडी चालवा भाऊ" ... असा बजावताना मी ऐकलं....... आणि एका वेगळ्याच विचारत मी रमून गेलो....

आज आपण बघतो की  मुलीला चांगल शिक्षण, चांगले कपडे , चांगल्या सोयी सुविधा कश्या उपलब्ध करून देता येतील या साठी सगळेच पालक खूप प्रयत्नशील असतात. आज कोणाच्या मुली मराठी माध्यम , कोणाच्या मुली कॉन्व्हेन्ट स्कूल , कोण दिल्ली बोर्ड तर कोण इंटरनॅशनल बोर्ड असा आपला खिसा न बघता पालक आपल्या मुलांच्या शिक्षणावर लक्ष देत असतात.
कोणाला ने आण करायला बस असतात कोणाला सोडायला प्रायव्हेट गाडी असते तर काही पालक स्वतः मुला-मुलींना सोडायला जात असतात.
पण हाच विचार करता करता मला मी काल सिग्नल वर पाहिलेल्या मुलीची म्हणजेच परी आठवण आली.....
जिच्या हातात कलर बुक होत्या आणि ती सहज सिग्नल वर १० रुपया ला त्या बुक विकत होती.. मी तिला आवाज दिलं आणि तिच्या कडून दोन बुक विकत घेतल्या.... तिला २० रुपये दिले. जाता जाता तिला मी तिच नाव विचारल तर तिने तिच नाव परी सांगितलं आणि हसत हसत पुढे निघून गेली... जिच वय आज शिक्षणाचं आहे आणि ज्या मुलीने इत्तर मुलीनं सारखं शाळेत जायला हवं , अभ्यास करायला हवा त्या मुलीची ही अवस्था बघून मला खूप लाचार झाल्या सारखं झालं.

तर ही परिस्थिती अश्या एका सिग्नलची नसून भारतात जिथे जिथे सिग्नल आहेत आणि जिथे जिथे फूट पाथ आहे तिथे तिथे परी नावाच्या गोड मुली आहेत. ज्यांना शिकायची हौस आहे व गरज ही आहे अश्या मुलींना गरिबी आणि लाचारीच्या मुळे आज घरच्यांचा पोटासाठी म्हणा किंवा जीवन जगण्यासाठी पुस्तक विकणे, खेळणी विकणे , खाद्य पदार्थ विकणे अशी सगळी कामं करावी लागत आहेत. 

अश्या मुलींना पुढे येण्याचा अधिकार नाही आहे का...? चांगल शिक्षण घेण्याचा, चांगल्या सोयी सुविधा मिळवण्याचा हक्क नाही आहे का ...?आणि ह्या मुलीनं साठी आपल प्रशासन काही करत असेल का... ह्या प्रश्नांनी मी हरवून गेलो.

जश्या नाण्याला दोन बाजू असतात तशीच एक बाजू होती त्या लहान चीमुडीची जी आपल्या आई च बोट पकडून बस मधून शाळेत गेली आणि दुसरी बाजू आहे ती परीची जिथे एका मुलीला त्याच वेळेला उठून उदरनिर्वाह साठी सिग्नल वर उभ राहून पुस्तक विकावी लागतात.

खरच एक गाम्भिर्याची बाब आहे आणि ह्या गोष्टीचा तुम्ही आम्ही एकदा तरी विचार करायलाच हवा. देशाचे एक सुजाण नागरिक म्हणून ह्या मुलींसाठी जर आपण काही करू शकलो तर नक्कीच आपल्या देशाचा येणार भविष्य हे उज्वल असेल.

आपल्या इथे खूप श्रीमंत लोक आहेत , ज्यांच्या कडे बक्कळ पैसा आहे, नाव आहे अश्यानी पुढे नाही आल तरी चालेल पण ज्यांच्याकडे मनाची श्रीमंती आहे आणि समाजाबद्दल ज्यांना आपुलकी आहे त्यानीं पुढे येवुन नकीच अश्या कुटुंबाला मदतीचा हात देण्याची आज नितांत गरज आहे....
फक्त पैश्याची मदत करून चालणार नाही जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे आपण परी सारख्या मुलींसाठी जबाबदारी म्हणून स्वीकार करून दत्तक म्हणा , शिक्षणाचं खर्च म्हणा, किंवा त्यांची शिक्षणाची जबाबदारी घेणं गरजेचं आहे.
 समजातल्या प्रत्येक एका कुटुंबातून येणाऱ्या उत्पन्नाच्या १% तरी अश्या मुलींच्या शिक्षणाचा किंवा त्यांना योग्य त्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी दिला तर कोणतीच परी आपल्याला कधी पुस्तक विकताना सिग्नल वर दिसणार नाही.

मी तर ठरवलंय की माझ्या मनातल्या परी साठी मी हे करणार , तुम्ही पण एकदा तुम्हाला दिसलेल्या अश्या परी साठी नक्की करा..... आनंद मिळेल आणि समाधान ही वाटेल....!

मी माझ्या मनातली परी तुम्हाला सांगितली, काही चुकलं असेल तर माफी असावी आणि आवडली असले तर अभिप्राय द्यायला विसरू नका..


लेखक
हितेश दुर्गुळे 




Comments