Posts

Showing posts from April, 2021

स्पर्धा परीक्षा आणि आजची पिढी.

Image
विषय तसा तुमच्या आवडीचा नसेल पण विषय खूपच गंभीर आहे म्हणून आज खूप दिवसानंतर एक असा विषय घेवून तुमच्या समोर आलो आहे. आज अचानक मी स्पर्धा परीक्षा हा विषय का बर घेतला असेल? असा विचार तुमच्या मनात नक्कीच आला असेल.  ह्यात गंभीर होण्यासारखी गोष्ट अशी आहे की , आज खूप तरुण मुलांना ही स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हेच माहित नसतं. कला, वाणिज्य आणि विज्ञान ह्या पलीकडे पण काही असत ह्याची माहिती देणार अस काहीच साधन आपल्या शिक्षण पद्धती मध्ये नाही. शिक्षण पद्धती मध्ये ह्याचा विषय कसा घेता येईल आणि एखाद्या मुलाचं समज्याप्रती असणारा आवड कशी जोपासली जाईल ह्या बदल तरी मला ठाऊक नाही पण आपला पाल्य जर अभ्यासात हुशार असेल  किंवा त्याला लोक सेवा करायची आवड असेल तर नक्कीच स्पर्धा परीक्षा हे एक उत्तम पर्याय आहे.  एखाद्या घरात पालक जर शिकलेले असतील किंवा कोणी जर ह्या क्षेत्रातल असेल तरच त्या मुलांना ह्याची माहिती उपलब्ध होते. परंतु आज आपल्या समाजात असे ही खूप विद्यार्थी आहेत जे गरीब आहेत परंतु त्यांची परिश्रम करायची तयारी आहे पण त्यांना दिशा दाखवणार कोणी नसते. आज आपल्याकडे इंटरनेट च एवढं ...