Posts

Showing posts from January, 2021

निरोप समारंभ

Image
  गुरुवर्य संध्या बाई ... नमस्कार...!  काही कारणास्तव मी आज ह्या समारंभास इच्छा असूनही उपस्थित राहू शकलो नाही त्यासाठी मी मना पासून तुमची माफी मागतो. मला माहित आहे जस शाळेत आमच्या चुकीमुळे तुम्ही आम्हाला शिक्षा करायच्या पण नंतर मात्र तुम्हाला ही वाईट वाटायचं.. तसच आज ही तुम्ही मला माझ्या ह्या चुकीला माफ नक्कीच करालच... बाई तुमच्या विषयी किती बोलावं तेवढं कमीच तरीही मला माझ्या मनातले दोन तीन अनुभव सांगायला नक्कीच आवडतील , अनुभव म्हणण्यापेक्षा तुमच्या शिकवणी ज्या मी माझ्या आयुष्यात आण्याचा प्रयत्न केला त्या आज मला इथे सांगाव्याशा वाटतात.. संध्याबाई आमच्या लाडक्या वर्ग शिक्षिका,  ह्यांचा आज निरोप समारंभ..... वयाची पस्तीस वर्ष तोच आदर, तेच राहणीमान ,तोच बोलण्यातला साधेपणा आणि एक उत्कृष्ट शिक्षक असं व्यक्तिमत्त्व.... आज बाईंचा शाळेतला शेवटचा दिवस ह्या नंतर कधीही आपण विद्यार्थी म्हणून शाळेत तरी बाईंच्या सनिर्ध्यात राहू शकणार नाही हा विचार मनाला कुठे तरी कुर्तोडतोय. ज्या बाईंच्या सनिर्ध्यात कित्येक वर्ष आपण हुंदडलो, खिदडलो आणि रडलोही.... ज्यांच्या सनिर्ध्यात आमच्या पाठीवर श...

कोरोनाचा कहर..!

Image
  मित्रा तुझं इम्यूनिटी सिस्टम छान असेल रे पण तुझ्या घरच्यांचं काय? तू जाशील बिंदास्त बाहेर,  पण कोरोना चा आणशील ना घरच्यांना आहेर... तुझे आहेत मित्र बाहेर जमवशिल तू गर्दी,  पण नंतर तुझ्या सोबत असेल फक्त ताप खोकला आणि सर्दी. स्वतःचा जीवन तर लावशील पणाला , पण घरच्यांना ही लावशील क्वारंटाईन करायला. तू फिरतोय आणि करतोयस जीवाची मज्जा,  पण माझा खाकितला माणूस दिवस रात्र भोगतोय ना त्याची सज्जा. माझे डॉक्टर आणि नर्सेस तर्स्ताहेत भेटायला घरच्यांना,  ही वेळ तुझ्या मुळेच तर आली नाही ना..!! हाथ जोडून विनवणी करतोय माझा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा , गप्प घरात बसा बाबांनो कोरोना नाही कोणाच्या जातीपातीचा... तूझ्याच हातात आहे सगळं..... हे दिवस पण जातील... तू फक्त एकदा निश्चऱ्य कर , पुन्हा तेच जुने दिवस येतील.. लेखक हितेश किशोर दुर्गुळे