निरोप समारंभ
गुरुवर्य संध्या बाई ... नमस्कार...!
काही कारणास्तव मी आज ह्या समारंभास इच्छा असूनही उपस्थित राहू शकलो नाही त्यासाठी मी मना पासून तुमची माफी मागतो.
मला माहित आहे जस शाळेत आमच्या चुकीमुळे तुम्ही आम्हाला शिक्षा करायच्या पण नंतर मात्र तुम्हाला ही वाईट वाटायचं..
तसच आज ही तुम्ही मला माझ्या ह्या चुकीला माफ नक्कीच करालच...
बाई तुमच्या विषयी किती बोलावं तेवढं कमीच तरीही मला माझ्या मनातले दोन तीन अनुभव सांगायला नक्कीच आवडतील , अनुभव म्हणण्यापेक्षा तुमच्या शिकवणी ज्या मी माझ्या आयुष्यात आण्याचा प्रयत्न केला त्या आज मला इथे सांगाव्याशा वाटतात..
संध्याबाई आमच्या लाडक्या वर्ग शिक्षिका,
ह्यांचा आज निरोप समारंभ.....
वयाची पस्तीस वर्ष तोच आदर, तेच राहणीमान ,तोच बोलण्यातला साधेपणा आणि एक उत्कृष्ट शिक्षक असं व्यक्तिमत्त्व....
आज बाईंचा शाळेतला शेवटचा दिवस ह्या नंतर कधीही आपण विद्यार्थी म्हणून शाळेत तरी बाईंच्या सनिर्ध्यात राहू शकणार नाही हा विचार मनाला कुठे तरी कुर्तोडतोय.
ज्या बाईंच्या सनिर्ध्यात कित्येक वर्ष आपण हुंदडलो, खिदडलो आणि रडलोही....
ज्यांच्या सनिर्ध्यात आमच्या पाठीवर शब्बास्कीची आणि कौतुकिची थाप बसली तशी गालावर शिक्षेची चापट बसली अश्या आमच्या लाडक्या बाईंना निरोप देताना आमचा हृदय एखाद्या भिंगा प्रमाणे तडकुन गेलय....
जरी आज आपण बाईंना निरोप देत आलो तरी अनेक कारणांमुळे संध्या बाई आमच्या मनात घर करून राहिल्या आहेत आणि त्यांना आम्ही कधी ही विसरू शकणार नाही.
संध्या बाई तुम्ही आम्हाला ज्ञान दिलत, तुम्ही आमच्या मनावर सुसंस्कार केलेत , सामाजिक आणि राष्ट्रीय बांधिलकीची जाण निर्माण केलीत, एखादा कुंभार जशी मडकी घडवतो तसं तुम्ही आम्हाला घडवलत....
तुम्ही जे दिलत ती आमची शिदोरी आहे शाळेच्या संकुचित क्षेत्रातून जगाच्या विस्तीर्ण क्षेत्रात आम्ही जे पदार्पण केले आहे आणि तिथे जी आमची वाटचाल होत आहे ना ती तुम्ही दिलेल्या शिदोरीच्या जोरावरच.....त्याबद्दल आम्ही सदैव तुमचे ऋणी राहणार आहोत.
तुमचे हे आजचे विद्यार्थी उद्या वेगवेगळ्या क्षेत्रात गरुडझेप घेणार आहेत आणि अशी उंच उंच घेप घेताना मनात एक जाणीव सतत राहणार आहे... असा झेपवताना आमच्या पंखात जे बळ आलं आहे ना ते संध्या बाई ते तुम्ही दिलेलं आहे.
तुम्हीच आम्हला ज्ञान अमृत पाजलत, तुम्हीच आमच्यात चैतन्य फुळवलत आणि तुम्हीच आम्हाला धैयपथावर धावायला शिकवल.
माडाच्या झाडाचा शेंडा उंच आकाशात डौलाने डोलत असतो कारण त्याला माहित असत की माझा हा डौल मला जमिनीशी घट्ट बांधून ठेवणाऱ्या मुळां मुळेच आहे ...
तसच आम्हाला ही ठाऊक आहे आमच्या भावी आयुष्याची बीज तुम्ही रुजवली आहेत आणि तुमच्या शिकवणीने ती दृढ झाली आहेत.
या निरोप समारंभात आज आम्ही तुम्हाला काही आश्वासन देऊ इच्छितो... ज्या ज्या वेळी तुम्ही आम्हाला मदतीसाठी हाक द्याल त्या त्या वेळी आम्ही नक्कीच तुमच्या हाकेला ओ देऊ..
बाई तुम्हीच आमच्या एक सुदृढ नागरिक निर्मिलात....
समाजातील दुर्बल घटकांना आपला मानून भुकेल्याला अन्न, निर्धाराला आधार आणि बेघराला आश्रय हेच आमचं कर्तव्य असेल आणि आम्ही ते नेटाने पार पाडू.
अजून एक शेवटची आठवण जी मला आज सांगावीशी वाटतेय ती म्हणजे..
आम्ही दहावीत असताना बोर्ड परीक्षेला तुम्ही जो आशीर्वाद म्हणून पेन दिला होता तसाच तुमचा आशीर्वाद आमच्यावर सदैव असू द्या...
ज्यानेकरून जसा दहावीच्या परीक्षेत तुमच्या पेन रुपी आशीर्वादाने आम्ही उत्तीर्ण झालो तसेच आयुष्यातल्या परीक्षेत ही तुमच्या मार्गदर्शन स्वरुपी आशीर्वाद घेवून आम्ही उत्तीर्ण होऊ...
एवढं बोलून मी तुमची रजा घेतो...
हितेश किशोर दुर्गुळे

Khup chan..... He vachun ahmla amchi school life athvali😀
ReplyDeleteहेच आमचं श्रेय.... धन्यवाद...!
Delete