शिवरायांचा मराठी समाज....!
आज विषय थोडा वेगळा, थोडा गंभीर, थोडा कोड्यात टाकणारा, थोडा विचार करायला लावणारा, आणि थोडा खरं सांगणारा...... हो खरं सांगणाराच....! खूप उद्दार मनाचे मराठी लोक.... गरिबांची सगळ्यात लवकर कीव येईल तो मराठी, आपल्या अर्ध्या भाकरीचा तुकडा पण समोरच्याला देवून स्वतः उपाशी राहेल तो मराठी, आणि शिवाजी महाराज की जय अस म्हंटल्यावर ज्याचा अंगावर शहारे येतील तो मराठी..... एवढा मोठा शिवरायांचा वारसा लागलेला हा मराठी समाज. शिवरायांच्या नावातून जगाला पण आपली ओळख करून देईल असा हा माझा समाज. खूप हेवा वाटतो मला मराठी असल्याचा खूप... हो खूपच. शिवजयंती , गणेशोत्सव, दही हंडी, गुढी पाडवा, दिवाळी, दसरा, मराठी दिवस आणि महाराष्ट्र दिवस असे अनेक उत्सव अभिमानाने साजरा करतो मराठी माणूस आणि जगाला छाती ठोकून सांगतो की ही सगळी माझ्या राजाची देणं आहे जर माझा राजा आमचे महाराज शिवराय नसते तर आज आपण नकीच एक वेगळ्या धर्माचे अनुयायी म्हणून ह्या देशात ह्या महाराष्ट्रात दिसलो असतो. महाराष्ट्र एक उदार मन असलेलं राज्य जिथे कोणालाही परका समझल जात नाही जो जो इथे पोटा पाण्यासाठी आला त्या त्या व्यक्तीला आणि त्या त्या...