श्री कृष्ण एक परिपूर्ण भगवान....!
Shree krishna...!
"श्री कृष्ण" म्हटलं तर एक गोड नाव पण मानलं तर एक परिपूर्ण भगवान.
"श्री कृष्ण" म्हटलं तर एक गोड नाव पण मानलं तर प्रेमाचं आणि शक्तीच एक अदभुत रूप.
चला तर ह्या गोड नावाला या उलट ह्या गोड नामरुपी परम परमात्म्याला जवळून जाणून घेवूया....!
तर कृष्णाला आपण विष्णुच रूप मानतो पण आपल्यापैकी खूप कमी लोकांना हे माहीत असेल की कृष्ण हा एक परिपूर्ण भगवान आहे.
कृष्ण जन्म हा जरी देवकीच्या उदरातून झालेला असला तरी भगवान श्री कृष्णाच्या स्व: इच्छेने झालेला आहे.
कृष्ण जन्म हे धरती वर होत असलेल्या पापाला रोखण्यासाठी व नराधमाला पापाची योग्य ती शिक्षा देण्यासाठी झाला. देवाचा हा अवतार सगळ्याच बाबतीत सर्व श्रेष्ठ आहे जिथे प्रेम ,माया, ममता, शक्ती , युक्ती, राजा , मित्र हे सगळे एकाच रुपात समाविष्ट होते तो अवतार म्हणजे श्री कृष्ण.
तर भगवान श्री कृष्ण धरतीवर अवतरणार हे ऐकुन पूर्ण देवलोक खूप आतुर होते. भगवंताची इवले इवले पावलं धर्तीवर पडणार म्हणून पूर्ण धरती आणि ब्रम्हांड खुलून गेल होत. देवाचं मानव रुपी हे स्वरूप पाहण्यासाठी सगळेच उत्सुक होते. अश्यातच एका रात्री देवकिच्या पोटी श्री कृष्ण जन्माला आले आणि पूर्ण धरती वर एक नावीन्य पूर्ण असे चैतन्य पसरले.
वासुदेवानी त्याच रात्री बाळ कृष्णाला मथुरेला यशोदा मातेकडे सुपूर्थ केले आणि आपले बाळ गोपाळ यशोदा मातेच्या छत्र छायेत वाढू लागले.
बाल कृष्णाच्या म्हणजेच भगवंताच्या लीला पाहून सगळेच भरवून गेले होते. बाळ कृष्णाचे हसणं , त्याचं ढोपऱ्यावर पुढे जाणं, त्याचं यशोदा मातेकडे बघणं सगळच मनमोहक होत आणि ह्याचा आंदन पूर्ण सृष्टी घेतच होती.
असे आपले बाळ गोपाळ यशोदा मातेच्या प्रेमात आणि कौतुकात वाढत होते . जसे जसे ते मोठे होत होते तसे तसे त्याचं मानव रुपी अवतार सगळ्यांना जाणवत होता.
भगवंताचा वागणं बोलणं सगळच एका तेजस्वी योग्यासारखे होत. गोपिकांच्या खोड्या काढत , मटकी मधले लोणी चोरून खाणे , सवंगड्या ना सोबत घेवून मधुर बासरी वाजवून सगळ्यांना मंत्रमुग्ध करणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना एका सामान्य माणसानं पेक्षा वेगळ ठरवत होत्या.
असा सगळ करत असताना एक दिवशी कालिया नागाला धडा शिकवण्यासाठी स्वतःहून रासलीला करून युमुना नदीत उडी टाकून एका विलक्षण शक्तीची जाणीव श्री कृष्णा ने लोकांना करून दिली. एवढ्या छोट्या वयात एवढे मोठे पराक्रम केले की लोक त्यांना न कळतं देवपण देवू लागले होते.
मूर्ती खूप लहान होती पण पराक्रम एवढे मोठे , पण त्या लोकांना हे कुठे ठावूक होत की एका भगवंताला हे कुठे कठीण आहे. एक परिपूर्ण भगवान ज्याच्या तालावर भूत , भविष्य आणि वर्तमान नाचतात तो भगवंत स्वतः लोकांमध्ये वावरत आहे.
असेच एक दिवस खूप मोठा पाऊस झाला आणि पूर्ण मथुरा नगरी पाण्याखाली गेली अश्यातच सगळ्यांचा लक्ष लागला होत ते माझ्या भगवंता कडे म्हणजे आपल्या बाळ कृष्णा कडे. सगळे बाळ कृष्ण कडे आले आणि भगवंताला विनवणी करू लागले की " हे बाळ कृष्णा आता तूच तारणहार वाचावं आम्हाला ह्या संकटातून" अशी आपल्या भक्ताच्या प्रत्येक हाकेला धावून येणारा माझा भगवंत बाळ कृष्णा ने सगळ्यांना आपल्या जवळ बोलवत गिरिधन पर्वत डाव्या करंगळी वर उचलून सगळ्यांचा रक्षण केलं.
असे अनेक लीला माझ्या बाळ कृष्णा ने केल्या त्यातल्या मला जितपत पेलवल ते मी लीहण्याच्या आणि सांगण्याचा प्रयत्न केला. काही चुकले असेल तर रसिकांनी चूक माफ करावी आणि अभिप्राय द्यावा.
लेखक
हितेश दुर्गुळे
Superb described Hitesh 👌👍
ReplyDeleteजय श्रीकृष्ण🙏
Keep it up brother 👍
जय श्रीकृष्ण भावा.
Deleteखुप छान भावा... मनातले शब्दात उतरवने हे खुप कठिन असते...आणि तू खुप छान प्रयत्न केला आहेस...असाच मोठा हो
ReplyDeleteधन्यवाद तुम्ही सोबत असाल तर नक्कीच मी पुढे जाऊन तुम्हाला पण घेवून... अशीच साथ असुदे भावा
Deleteखूप छान आणि आम्हाला श्रीकृष्णाचे मूळ रूप आणि त्याची कीर्ती ही हितेश तुझ्यामुळे कळाली
ReplyDeleteKhup mast hitesh
ReplyDelete