शिवरायांचा मराठी समाज....!




आज विषय थोडा वेगळा, थोडा गंभीर, थोडा कोड्यात टाकणारा, थोडा विचार करायला लावणारा, आणि थोडा खरं सांगणारा...... हो खरं सांगणाराच....!

खूप उद्दार मनाचे मराठी लोक.... गरिबांची सगळ्यात लवकर कीव येईल तो मराठी, आपल्या अर्ध्या भाकरीचा तुकडा पण समोरच्याला देवून स्वतः उपाशी राहेल तो मराठी, आणि शिवाजी महाराज की जय अस म्हंटल्यावर ज्याचा अंगावर शहारे येतील तो  मराठी.....

एवढा मोठा शिवरायांचा वारसा लागलेला हा मराठी समाज.
शिवरायांच्या नावातून जगाला पण आपली ओळख करून देईल असा हा माझा समाज. खूप हेवा वाटतो मला मराठी असल्याचा खूप... हो खूपच.
शिवजयंती , गणेशोत्सव, दही हंडी, गुढी पाडवा, दिवाळी, दसरा, मराठी दिवस आणि महाराष्ट्र दिवस असे अनेक उत्सव अभिमानाने साजरा करतो मराठी माणूस आणि जगाला छाती ठोकून सांगतो की ही सगळी माझ्या राजाची देणं आहे जर माझा राजा आमचे महाराज शिवराय नसते तर आज आपण नकीच एक वेगळ्या धर्माचे अनुयायी म्हणून ह्या देशात ह्या महाराष्ट्रात दिसलो असतो.

महाराष्ट्र एक उदार मन असलेलं राज्य जिथे कोणालाही परका समझल जात नाही जो जो इथे पोटा पाण्यासाठी आला त्या त्या व्यक्तीला आणि त्या त्या समाझ्याला आपल करून घेणारा महाराष्ट्र. इथे एक ही व्यक्ती धर्म , जात , रूपाने न ठरवता तो महाराष्ट्रीयन म्हणूनच ओळखला जातो. इथे प्रत्येकाला त्याच्या वाटेचा पुरेसा आहार मिळतोच असा असताना आज महाराष्ट्रात मराठी समाजाला त्याचा योग्य तो दर्जा मिळतोय का हो......?

मिळतोय असा म्हणत असाल तर नक्कीच तुम्हाला जाग होण्याची गरज आहे...... 

आज महाराष्ट्रात मराठी म्हणून ओळखला जातो तो म्हणजे फक्त आणि फक्त कामगार वर्ग.
ऑफीस बॉय, मोठ्या मोठ्या कंपन्या मध्ये स्टाफ म्हणजेच कामगार, घरकाम करणाऱ्या स्त्रिया, पेपर वाला, दूध वाला, आणि अजून बरीच अशी धंदे आहेत जिथे मराठी माणसाला राबवून घेतल जात.
जे मी लीहतोय ते खरं नाही अस जर तुम्ही समझून चालत असाल तर तुम्ही चुकत आहात....तर बाबांनो जागे व्हा  हीच खरी परिस्थिती आहे.

मी ऑफिस ला जातो आणि संध्याकाळी येताना एक मस्त ९० क्वार्टर मारून , बायकोला दोन चार मोठे आवाज चढून शब्द ऐकवून रुबाब दाखवण्या पलीकडे मराठी माणसाला जमतंय तरी काय असा दृष्टीकोन लोकांच्या म्हणजेच इतर राज्यातून आलेल्या लोकांचा होत आहे. असा मराठी समजाबदल होणार हा दृष्टीकोन कोणी बदलू पाहत नाही ह्याची मला खंत वाटतेय..


आज आपण एका सत्य परिस्थितीकडे वाटचाल करूया...
ह्या परिस्थितीला जर आपल्याला बदलायच असेल किंवा लोकांचा मराठी मासाकडे बघायचा दृष्टीकोन बदलायचा असेल तर आताच आपण ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे.

सगळ्यात मोठा सत्य ते अस की " एक मराठी माणूसच मराठी माणसाचं पाय खेचतो" आज हे सत्य आपल्याला बदलण्याची गरज आहे.  आता वेळ आहे ती पाय खेचण्याची नाही तर आता वेळ आहे ती एकमेकांना साथ देण्याची.
जसे इतर समाज आपल्या समाजाला वरती आणण्यासाठी एकमेकांना सहकार्य करतात तसेच आपण ही आपल्या बरोबरच्या मराठी कुटुंबाला मदतीचा हात देणं गरजेचं आणि अनिवार्य आहे.

आज आपण पाहतोय आपली मराठी युवा पिढी ही वाईट मार्गाला जात आहे , एखाद्या राजकीय पार्टी मध्ये जाऊन एकमेकांचे विरोधक बनत आहेत, शिक्षणाकडे पाठ फिरवून  सिगारेट , दारू व अन्य अमली पदार्थाच्या मागे ही युवा पिढी झुकताना दिसते आहे. हे कुठे तरी थांबवलं गेल पाहिजे. युवा पिढी मध्ये योग्य ते मार्गदर्शन होण गरजेचं आहे  योग्य ते शिक्षण आणि खरं म्हटलं तर व्यावसायिक शिक्षण युवा पिढी साठी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे.
एखाद्या राजकीय पक्षाचा झेंडा घेवून पक्षाच्या नावाखाली , हप्ता घेणं , दादागिरी करून वर्गणी गोळा करणं हे आपल कर्तव्य नसून युवा पिढीने स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हीच युवा पिढी पुढे त्याच्या जीवावर मराठी माणसाचा अस्तीत्व टिकवू शकेल नाहीतर येणारी पुढची पिढी ही सुधा परकीय लोकांच्या गुलामगिरीत कामगार म्हणूनच ओळखली जाईल आणि हाच विषय त्यावेळी त्यांना मांडण्याची वेळ येईल.

आज खूप कमी लोकांना माहिती असेल की गाव गावात किंवा मुंबई सारख्या शहरात वोट बँक बनवली जाते. जिथे ज्या लोकांचा जास्त वास्तव्य आहे तिथल्या समाजातल्या लोकांचा आवडी निवडीचा खूप विचार केला जातो आणि बाकी समाजावर दुर्लक्ष्य केलं जातं. ज्या प्रमाणे परकीय लोक इथे येवुन आपली स्वतःची वोट बँक बनवतात तसेच इथल्या भूमी पुत्राला इथल्या मराठी समाजाला हे कसं जमतं नाही. परकीय लोकांची संख्याबळ कमी असून देखील त्यांच्या आवडी निवडीचा खूप विचार केला जातो आणि आणि मराठी माणसाची संख्याबळ जात असून सुधा त्यांचा विचारच केला जात नाही असा का...?
वोट बँक मराठी मासाची जास्त तरी निर्णय हा परकीय लोकांच्याच मताने कसा हो लागतो....?
केलाय का कधी विचार....?
नाही ना.....!

तर हे अस की परकीय लोकांची वस्ती आणि संख्याबळ कमी आहे पण तो सर्व समाज हा एक आहे आणि आपली मराठी लोकांची संख्याबळ जास्त असून देखील ती दुभागली गेली आहेत. जर आपल्या महाराष्ट्रात जर मराठी लोकांचा विचार सर्वात आधी व्हायला हवा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. ह्याच्या जोरावरच तुम्ही तुमचं महाराष्ट्रातला अस्तीत्व कायम ठेवू शकता.
 
पुन्हा विचार करा की आपण एका महाराज्यांच्या नावाखाली ओळखले जातो व त्यांची छबी ही पूर्ण विश्वात काही आहे .
तसेच आपण आपली छबी ही कशी जपली पाहिजे.

खूप गोष्टी अधोरेखित करता आल्या असत्या पण ज्या गोष्टीची आवश्यकता आज वाटते आहे ती इतकीच की.....

 "५ काठ्या ह्या एक एक करून मोडता येतील पण ह्याच ५ काठ्या जर एकत्र केल्या तर मोडण अवघड आहे."


एवढच सांगून मी तुमची रजा घेतो. काही चूक झाली असेल तर वाचकांनी माफ करावं आणि  लेख आवडला असेल तर नक्की अभिप्राय द्यावा.

लेखक
हितेश कि. दुर्गुळे


Comments

  1. अप्रतिम लेक आणि मराठी माणसाने खरचं विचार करण्याची गरज आहे आणि मराठी माणसा मधला पाय खेचण्याची प्रथा बंद झाली पाहिजे आणि युवा पिढी ही भरकट जात आहे तर त्यांना मार्गदर्शन आणि व्यवसाय मार्गदर्शन ची गरज आहे त्याचा आपण सक्षम युवा प्रतिष्ठान पूर्ण करण्याचा प्रयत्न करू

    ReplyDelete

Post a Comment