स्पर्धा परीक्षा आणि आजची पिढी.
आज अचानक मी स्पर्धा परीक्षा हा विषय का बर घेतला असेल? असा विचार तुमच्या मनात नक्कीच आला असेल.
ह्यात गंभीर होण्यासारखी गोष्ट अशी आहे की , आज खूप तरुण मुलांना ही स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हेच माहित नसतं. कला, वाणिज्य आणि विज्ञान ह्या पलीकडे पण काही असत ह्याची माहिती देणार अस काहीच साधन आपल्या शिक्षण पद्धती मध्ये नाही. शिक्षण पद्धती मध्ये ह्याचा विषय कसा घेता येईल आणि एखाद्या मुलाचं समज्याप्रती असणारा आवड कशी जोपासली जाईल ह्या बदल तरी मला ठाऊक नाही पण आपला पाल्य जर अभ्यासात हुशार असेल किंवा त्याला लोक सेवा करायची आवड असेल तर नक्कीच स्पर्धा परीक्षा हे एक उत्तम पर्याय आहे. एखाद्या घरात पालक जर शिकलेले असतील किंवा कोणी जर ह्या क्षेत्रातल असेल तरच त्या मुलांना ह्याची माहिती उपलब्ध होते. परंतु आज आपल्या समाजात असे ही खूप विद्यार्थी आहेत जे गरीब आहेत परंतु त्यांची परिश्रम करायची तयारी आहे पण त्यांना दिशा दाखवणार कोणी नसते.
आज आपल्याकडे इंटरनेट च एवढं मोठं प्रचंड असा जाळ आहे पण त्यावर काय आणि कुठे शोधायच हेच आपल्याला माहित नसतं. आज प्रत्येक तरुण मुलं मुलीनं कडे मोबाईल आहेत पण त्याचा वापर फक्त आणि फक्त व्हॉट्सॲप, इंस्टग्रम, फेसबुक आणि चित्रपट बघण्यासाठी केला जातोय.
आज इंटरनेट वर सगळी माहित उपलब्ध आहे तरीही आजची तरुण मुल त्या गोष्टी कडे दुर्लक्ष करताहेत.
पण जर एखाद्या जागरूक नागरिकांनी फक्त आपल्या आसपासच्या दोन-तीन मुलाचं जरी मार्गदर्शन केलं तरी ही तरुण पिढी त्यांचं पुढचे आयुष्य बदलण्यास प्रवृत्त होईल.
आज महाराष्ट्रातील मुला-मुलींना स्पर्धा परीक्षा योग्य मार्गदर्शन केलं गेलं तर ही पिढी नक्कीच पुढे जाऊन महाराष्ट्र घडवेल आणि भारताचा ही विकास होईल.
स्पर्धा परीक्षा मध्ये का भाग घ्यावा?, सरकारी नोकरी म्हणजे काय?, त्या कशा मिळवल्या जातात?, त्याने काय फायदा होईल?, त्याने तुमचे जीवन कसे बदलले जाईल? ह्या बदल जागरूकता निर्माण करण्याची आज अत्यंत गरज आहे.
का म्हणून इतर राज्यातील मुल फक्त स्पर्धा परीक्षा कडे लक्ष केंद्रित करतात आणि हीच मुल आज आपल्या इथल्या मोठ्या मोठ्या पोस्ट वर विराजमान आहेत. राज्य स्तरीय सेवा आणि केंद्र स्तरीय सेवा ह्यासाठी मुलांना जागरूक करण्याची वेळ आहे आणि ती आपणच करू शकतो. तसा विचार करायला गेलात तर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करणे म्हणजे काय सोपी गोष्ट नाही. परंतु ती अशक्य ही नाही. नियमित वाचन, एक योग्य असे अभ्यासाचे नियोजन , जिद्द आणि दृढता आपल्या आचरणात आणली की नक्कीच आपला विजय आहे.
"आपल्या ह्या गोष्टी वाचून दुसरं पर्याय नाही" अस समझुन आणि एक जिद्ध म्हणून आपण त्याला सामोरे गेलो तर तुम्ही नक्कीच ह्यातून पार जाऊ शकतात.
आज आपल्या समोर विश्वास नांगरे पाटील ह्याच्या सारखं जिवंत उदाहरण आहे हे पण एका छोट्याश्या गावातून आलेले विद्यार्थी होते पण आज त्यांनी केलेलं काम केलंय , पराक्रम केला आहे ते कोणाला सांगायची गरज नाही. असे खूप उदाहरण आहेत ज्यात त्यांनी आपली ध्येय जोपासली , परिश्रम केले, जिद्द ठेवली आणि ती पण न डगमगता. "आता गड लढायला घेतलाच आहे ना तर हा गड सर करायचाच!"असा दृढ विश्वास करूनच आपण आपली तयारी चालू करायला हवी. आज समाज सुधारणे साठी, लोकांच्या हितासाठी , लोकांच्या सेवेसाठी नवीन पिढी ही प्रवृत्त झालीच पाहिजे.
चातक पक्षी जसा पावसाची वाट बघतो , तश्या पद्धतीने जर आपण आपला सराव केला आणि जिद्द ठेवली तर ज्या वेळी तुम्ही उत्तीर्ण व्हाल तेंव्हा त्या भावनेचा स्वाद हा त्या पावसाची वाट बघणाऱ्या चातक पक्ष्या प्रमाणेच असेल.
लेखक
हितेश किशोर दुर्गुळे.
अप्रतिम लेख मित्रा.एकदम योग्य विषयाला हाथ घातला आहेस आज मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी या लेखातून नक्कीच बोध घेतील आणि तयारी का लागतील
ReplyDeleteDhanywad
Delete