social media





सोशल मीडिया.....

आज जिथे तिथे लोक सोशल मीडियाद्वारे खूप पुढे जात आहेत. सोशल मीडियामुळे आज जग जवळ येत चाललं आहे. आज आपण घर बसल्या एखाद्या लांबच्या जागेवर फिरून येवू शकतो , तिथल्या वेगवेगळ्या ठिकाणची माहिती घेवू शकतो , बघुही शकतो शिवाय आपल्या पासून खूप दूरवर असणाऱ्या माणसांशी बोलू ही शकतो.

पण खरच एवढ सोप होतं का हो हे सगळं ......
कित्येक वर्ष लागली हो कित्येक वर्ष....

लोक पत्र व्यवहार , तार,  फोन , ईमेल, व्हिडिओ कॉल , व्हॉटसअप , ऑर्कुट, फेसबुक , गूगल, युट्यूब आणि इंस्टाग्रम..... ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायला जरा वेळच लागला. लोकांना वेळ लागला ते अपडेट व्हायला..

पण जसं जस लोक ह्याच्या जवळ येवुन स्वतःची प्रगती करत गेले तसे तसे लोक समाजापासून आणि माणुसकी पासून लांब होते गेले.
आपण बघतोय आज लोक एखादी गोष्ट करायची असेल तर प्रथम गूगल करतात... का तर गूगल वर सगळं माहिती असते. पण जसं जसे आपण स्वतःला ह्या गोष्टीची सवय लावून घेतली आहे त्या मुळे आपण स्वतःच्याच घरातील माणसानं पासून म्हणजेच आपल्या माणसानं पासून दुरावत आहोत हे आपल्याला समजत नाही आहे.
युवा पिढी ही तर ह्यात पूर्ण पणे सामावून गेलेली बघायला  मिळते म्हणजे एखादी गोष्ट केली तर ती सोशल करण्याशिवाय आपल्याला जमतच नाही.
अगदी जेवायचं ताट म्हणून नका, कुठे फिरायला गेलो,  मित्राचा वाढदिवस पासून एखाद्याच्या अंत्यात्रे पर्यंतचे  फोटो नक्कीच आपल्याला पहावयास मिळतात. 
साधी आज नुसती मदत केली तरी ही लोक स्टेटस अपडेट करायला विसरत नाहीत. ही अवस्था झाली आहे आपली सोशल मीडिया आल्यापासून.....

लोकांना आज घरात एकत्र बसून बोलायला वेळ नसतो. लोक कॉल वर बोलतात आणि एक दुसऱ्यांची सवांद साधताना बघायला मिळतं. आज आपण घरात असतो पण आपल विश्व हे आपल्या मोबाईल मध्ये अटकलेल असतं. आपण घरी असून पण नसल्यासारखेच असतो.. 
मला तर खरच अस विचारायला आवडेल की आपण घरी असताना नेमक घरतल्यांशी किती हो बोलतो...?
सॉरी... मला माफ करा प्रश्न चुकला...
आपण घरात आल्यावर बोलतो का एकमेकांशी हा बरोबर प्रश्न आहे , हो की नाही...?
घरची ही अवस्था आहे तर विचार करण्याची गोष्ट आहे की आपल पुढचं आयुष्य कसं होत जाणार आहे..

आज आपण बघतोय की ह्याच सोशल मीडियाचा कित्येक लोक स्वतःच्या प्रगतीसाठी वापर करत आहेत तर काही वाईट प्रवृत्तीचे लोक ह्याचा गैरफायदा घेताना दिसतात.
आपण बघतोय की कसे फेसबुक आणि इतर सोशल मीडिया वर काही जातीवादी आणि भडकावू भाषण असलेले व्हिडीओ पसरवले जातात आणि त्याच गोष्टीतून जनसामान्य लोकांचे किती हाल होतात आणि देशाच्या संपत्तीचा किती नुकसान होतं.
ह्या अश्या समाज वादांचा आणि जागतिक स्थरावर जातीवादी मतभेद निर्माण होऊन दंगली आणि इतर प्रकार होण्याच्यासाठी ही सोशल मीडियाच जबाबदार आहे.

जसे नाण्याला दोन बाजू असतात तश्याच ह्या सोशल मीडिया सारख्या गोष्टीला ही दोन बाजू आहेत त्यातली चांगली आणि वाईट दोन्ही बाजू आपण खूप चांगल्या प्रकारे  जाणता आणि तेवढे आपण वैचारिक आहातच असे मी समजतो आणि तुमची रजा घेतो.
 
पण जाता जाता एवढंच सांगून जातो.. की 
सोशल मीडिया पेक्षा ही चांगल वातावरण आपल्या समाजात आहे, आपल्या घरात आहे आणि आपल्या लोकांमध्ये आहे.
जसे व्हॉटसअप वर बोलायला जेवढं आपल्याला सोयीस्कर वाटत तसे तोच मोबाईल बाजूला ठेवून प्रत्येक्षात आपल्या माणसाशी बोलण्यात तेवढाच गोडवा आणि आनंद आहे अनुभवणे गरजेचं होत चाललं आहे. एखाद्या गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो तस आपण सोशल मीडिया वापर जरुरी असेल आणि योग्य त्यातच ठिकाणी करायला हवा आणि जमेल तेवढं माणुसकी जपून आपापसात मिसळून बंधुभाव वाढवण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही.

काही चूक झाली असेल तर वाचकांनी माफ करावं आणि  लेख आवडला असेल तर नक्की अभिप्राय द्यावा.

लेखक
हितेश कि. दुर्गुळे

Comments

  1. Khupp sunder lihilays hitesh😊

    ReplyDelete
  2. अप्रतिम विश्लेषण
    काळ हा हरवत चाललाय मोबाईल च्या दुनियेत. मोबाईल मुळे खरं जीवन जगणं आपण विसरलो आहे.
    हितेश सुंदर स्पष्टीकरण आणि सुंदर वाक्यरचना.👍👌

    ReplyDelete
  3. हितेश मित्रा खूप छान लिहिला आहेस आणि खरंच आजची पिढी हे मोबाईल मध्ये खूप व्यस्त आहे आणि सोशल मीडियाचे महत्त्व आणि कुटुंबातील सदस्य कुटुंबापासून कसे लांब जात आहेत याची जाणीव करून दिलीस आणि प्रत्येकाने ह्या मधून बोध घेतला पाहिजे

    ReplyDelete
  4. खूप सत्य परिस्थिती आहे ... वीचार करायला लावणारी .. खूप सुंदर लेख मनःपूर्वक आभार 👌👌🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment